Ad will apear here
Next
७० लाखांचे पॅकेज नाकारून इलेक्ट्रिक वाहनांची कंपनी सुरू करणारा जिगरबाज अली
उच्च शिक्षण घेतल्यानंतर तरुणांना गलेलठ्ठ पगाराची नोकरी हवी असते. लाखो रुपयांच्या पॅकेजची ऑफर सहसा कोणी नाकारत नाही; पण दिल्लीच्या मोहम्मद आमिर अली या जिगरबाज तरुणाने थोड्याथोडक्या नाही, तर ७० लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी नाकारली आणि  भारतात राहून देशासाठी काही तरी करण्याच्या इच्छेने इलेक्ट्रिक वाहने बनवणारी स्वतःची कंपनी सुरू केली. अलीच्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल...
....
मोहम्मद आमीर अलीमोहम्मद आमिर अलीने २०१८ मध्ये शामरिक मोटर्स ही कंपनी सुरू केली. बॅटरीवर चालणारी दुचाकी तयार करणं या उद्देशाने त्याने या कंपनीचा पाया रचला. स्वस्त आणि झटपट चार्ज होणाऱ्या दुचाकी बनवण्याची अलीची इच्छा होती; पण त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. अलीने जामिया मिलिया इस्लामियामधून इंजिनीअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर त्याला ७० लाख रुपयांचं पॅकेज मिळणार होतं. एका अमेरिकन कंपनीने त्याला ही ऑफर दिली होती. वर्षाला ७० लाख रुपये कमावण्याची स्वप्न कोण बघत नाही? अलीचं स्वप्न वयाच्या २४ व्या वर्षीच पूर्ण होणार होतं. ऐषोआराम त्याची वाटत बघत होता. अली श्रीमंत होणार होता; पण त्याने ही ऑफर नाकारली. नोकरी न करण्याचा निर्णय घेतला. आपल्या क्षेत्रात अत्यंत निपुण असणाऱ्या अलीला वेगळी वाट निवडायची होती.

अली गणित आणि विज्ञान या दोन्ही विषयांमध्ये हुशार होता. सुरुवातीला तो हिंदी माध्यमात शिकला. मग त्याला ऊर्दू माध्यमात घालण्यात आलं आणि अखेरीस तो इंग्रजी माध्यमात दाखल झाला. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणं अलीला खूप कठीण गेलं. अलीला विज्ञानाची प्रचंड आवड होती. अलीने लहानपणापासूनच वडिलांना इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्त करताना बघितलं होतं. विज्ञानाची गोडी वाढत चालली होती. बऱ्य च प्रश्नांची उत्तरं शोधायची होती. म्हणूनच त्याने बारावीनंतर इंजिनीअरिंगला प्रवेश घ्यायचं ठरवलं. जेईई परीक्षाही दिली; पण दुर्दैवाने अलीला कमी गुण मिळाले. गुणांच्या बळावर त्याला प्रवेश मिळू शकणार नव्हता. अलीला आर्किटेक्चरला प्रवेश घेता आला असता; पण विज्ञानाची आवड त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. मग त्याने एक वर्ष विश्रांती घेतली. त्यानंतर २०१५ मध्ये जामिया मिलिया इस्लामियामध्ये इंजिनीअरिंग डिप्लोमाला प्रवेश घेतला.

२०१७ मध्ये वडील आणि मित्रांनी केलेल्या आर्थिक मदतीच्या बळावर मारुती ८०० विकत घेतली. त्याने या गाडीचं रुपांतर इलेक्ट्रिक कारमध्ये केलं. त्याची प्रतिकृती तयार होती. हा प्रकल्प पुढे नेण्याच्या दृष्टीने त्याने आर्थिक मदत मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले; पण सुरुवातीला कोणीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. उलट मस्करीच केली. कॉलेजमधल्या एका प्राध्यापकाने त्याला मदत करायची तयारी दाखवली. 

वार्षिक परीक्षेआधी एक अमेरिकन कंपनी या कॉलेजमध्ये आली. त्यांना अलीच्या शोधाबद्दल कळलं होतं. या कंपनीने त्याला ७० लाख रुपयांचं पॅकेज देण्याची तयारी दाखवली; पण अलीने ही संधी नाकारली. भारतात राहून देशासाठी, समाजासाठी काही तरी करण्याच्या इच्छेने त्याने ही कंपनी सुरू केली. अलीच्या या निर्णयाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.

मोहम्मद आमिर अलीसह त्याच्या शामारिक मोटर्स कंपनीतील सहकारी
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZOLCH
Similar Posts
‘टाटा प्रोजेक्ट्स’ला आयआयटी संस्थांमध्ये उदंड प्रतिसाद मुंबई : टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड या भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या व सर्वांत प्रशंसाप्राप्त संरचना कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीने या वर्षी दिल्ली, मुंबई, मद्रास, कानपूर आणि खरगपूर या भारतातील आघाडीच्या पाच आयआयटी संस्थांमधून ५० इंजिनीअर्सची नियुक्ती केली आहे.
रोवा वाहतूक सेवेची मुहूर्तमेढ दोस्तांनो, सध्या खूप शिकूनही मनासारखी नोकरी मिळत नाही. एखादी नोकरी मिळालीच तर पगार कमी असतो. अशा वेळी स्वत:चा एखादा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना वाईट नाही. अशा एका व्यवसायाविषयी...
जाहिरात उद्योगाची आई भारतीय जाहिरात उद्योगाची आई अशी ओळख असलेल्या जाहिरात गुरू तारा सिन्हा यांचे अलिकडेच निधन झाले. त्यानिमित्त त्यांचा हा अल्प परिचय....
‘क्विकहील’ला ‘डीएससीआय’तर्फे पुरस्कार मुंबई : क्विकहील टेक्नॉलॉजीज लिमिटेडला ‘डीएससीआय एक्सलन्स अॅवॉर्ड २०१९’मध्ये नासकॉमच्या डेटा सिक्युरिटी काउन्सिल ऑफ इंडियाद्वारे (डीएससीआय) ‘सायबर सिक्युरिटी प्रॉडक्ट पायोनियर इन इंडिया’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language